शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:28 IST

वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर, न्या. अब्दुल नजीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. ३१) फेटाळला.

ठळक मुद्दे नगरच्या याचिका फेटाळल्या : निळवंडेसह इतर वरच्या धरणांतून उद्या पाणी येणार

औरंगाबाद : वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर, न्या. अब्दुल नजीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. ३१) फेटाळला. परिणामी निळवंडेसह वरच्या इतर धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान निळवंडेसह वरच्या धरणांतून उद्या सकाळी आठ वाजता पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांनी दिली.कोणत्याही धरणातील पाण्याचा साठा ६५ टक्क्यांच्या खाली गेल्यास पाणी वाटप समितीच्या (एमडब्ल्यूआरआरए) मार्गदर्शक तत्त्वानुसार वरच्या धरणांतून त्या धरणात पाणी सोडले जाते. त्यानुसार १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या पाहणीत जायकवाडी धरणात केवळ ३६.६३ टक्के पाणीसाठा असल्याचे आढळले होते. म्हणून गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी २३ आॅक्टोबर रोजी वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.या निर्णयाविरुद्ध अहमदनगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना आणि कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज (आयए) दाखल करून त्यांच्या परिसरात कमी पाऊस पडल्यामुळे उसासाठी पाणी हवे. वरच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, अशी विनंती केली होती. त्यापैकी डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.विखे साखर कारखान्यातर्फे ज्येष्ठ वकील शेखर नाफडे, संजीवनी कारखान्यातर्फे अ‍ॅड. एम. वाय. देशमुख, गोदावरी महामंडळातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण, अ‍ॅड. व्ही. कृष्णमूर्ती आणि अ‍ॅड. प्रशांत पद्मनाभन यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. चैताली चौधरी-कुट्टी यांनी सहकार्य केले. महाराष्टÑ शासनातर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल नाडकर्णी यांनी काम पाहिले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय