विद्यार्थ्यांना मोफत साहित्य

By Admin | Updated: June 22, 2014 00:25 IST2014-06-22T00:06:54+5:302014-06-22T00:25:38+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यासाठी ठिक -ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

Free literature for students | विद्यार्थ्यांना मोफत साहित्य

विद्यार्थ्यांना मोफत साहित्य

हिंगोली : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यासाठी ठिक -ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
पहेणी : हिंगोली तालुक्यातील पहेणी येथील जि.प. प्राथमिक शाळेत गणवेश व पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिक घोंगडे, उपाध्यक्ष गंगुबाई मोरे, मुख्याध्यापक व्ही.टी. डांगे, गिरी, काळे, धाबे, रणखांब, कुकडे, पाम्पटवार, कदम, नांदे, भगवान घोंगडे, सुरज मोरे आदींची उपस्थिती होती.
औंढा नागनाथ : तालुक्यातील गांगलवाडी येथील रतनसिंग नाईक माध्यमिक आश्रमशाळेत पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब पवार, प्रकाश ठाकरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
बासंबा : येथील अन्नपुर्णा विद्यालयात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके देण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष गोवर्धन विरकुंवर, प्राचार्य बाबासाहेब इंगोले, शिक्षक एम.टी. तनपुरे, व्ही.के. कुबडे, पी.के. रहाटे, आर.एल. जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बी.एस. जगताप, एस.डी. कोकाटे, एम.आर. मिटकर, ए.जी. शिंदे, एम.सी. कान्हेड, घुगे, ढाले, कोरडे, घनसावंत आदींनी पुढाकार घेतला.
हिंगोली : शहरातील माणिक स्मारक आर्य विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव ओमप्रकाश भारुका, अनिल भारुका, मुख्याध्यापक एस.यु. सुर्यवाड, एम.एम. लोकडे, पर्यवेक्षक एस.एस. क्यातमवार, गं्रथपाल एस.बी. ढोके, ए.एम. पत्की आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Free literature for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.