वडगावात मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:20 IST2019-04-11T23:20:38+5:302019-04-11T23:20:45+5:30

वडगाव कोल्हाटी येथे गुरुवारी मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

 Free health check-up in Vadgaon | वडगावात मोफत आरोग्य तपासणी

वडगावात मोफत आरोग्य तपासणी

वाळूज महानगर: क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीतर्फे वडगाव कोल्हाटी येथे गुरुवारी मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.


आनंद बुद्ध विहारात आयोजित शिबिरात प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कृष्णा साळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पं.स. सदस्य सतीश पाटील, रामदास बर्फे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश दाभाडे, प्रविण नितनवरे, संतोष लाठे, प्रकाश निकम, पंजाब साठे, संतोष उगले, चक्रधर डाके आदी उपस्थित होते. शिबिरात डॉ. अभिजित खेबडे, डॉ. दीपाली पाटील, डॉ. जितकर, डॉ. मितेश खंडागळे यांनी रुग्णांची तपासणी केलीे. दोनशेपेक्षा अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यशस्वीतेसाठी उत्तम बिराडे, गयाबाई साळवे, विमल दळवी, कौशल्या निकम, अशोक निकम, मुकेश साळवे, मुकेश मोहन, राहुल लोंढे, ऋषीकेश परकारे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Free health check-up in Vadgaon

टॅग्स :Walujवाळूज