‘मुक्त’च्या परीक्षा ‘कॉपी’युक्त

By Admin | Updated: June 9, 2017 00:58 IST2017-06-09T00:56:52+5:302017-06-09T00:58:15+5:30

बीड : सध्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत सर्रास कॉप्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे दिसत आहे.

'Free' exam is 'copy' | ‘मुक्त’च्या परीक्षा ‘कॉपी’युक्त

‘मुक्त’च्या परीक्षा ‘कॉपी’युक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सध्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत सर्रास कॉप्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे दिसत आहे. भरारी पथकाने दोन दिवसांत जिल्ह्यातील ५ केंद्रांवर धाडी टाकीत तब्बल १३२ कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली आहे. यावरून ‘मुक्त’च्या परीक्षा ‘कॉपी’युक्त होत असल्याचे उघड झाले आहे.
मागील १५ दिवसांपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., एम.ए. अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. जिल्ह्यातील २३ केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे. बीड शहरात बलभीम महाविद्यालय, केएसके महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अध्यापक विद्यालय अशी तीन परीक्षा केंद्रे आहेत. या तिन्ही केंद्रांवर भरारी पथकाने भेट देऊन कॉपी करणाऱ्यांना पकडले आहे.
मुक्त विद्यापीठाची परीक्षा देण्यासाठी जवळपास विविध नोकरी करणारे अधिकारी, कर्मचारी हे विद्यार्थी म्हणून असतात; परंतु पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख यांना हाताशी धरून सर्रासपणे कॉपी करून पास होण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात सर्रासपणे सुरू आहे. याबाबत अनेक वेळा औरंगाबादसह नाशिक विद्यापीठाला तक्रार केली; परंतु यावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. यावरून हे वरिष्ठ अधिकारीही या कॉपीबहाद्दरांना अभय देत असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून केला जात आहे.
बलभीममध्ये १५ विद्यार्थी
गुरुवारी बी.ए. दुसऱ्या वर्षाचा इंग्रजीचा पेपर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत होता, तर एम.ए. दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचा भाषा विषयाचे पेपर होते. दुपारी चार वाजता भरारी पथकाने बलभीम महाविद्यालयात तपासणी केली असता तब्बल १५ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.
बुधवारी ५२ विद्यार्थ्यांवर कारवाई
मुक्त विद्यापीठातील भरारी पथकाने बुधवारीही शहरातील केएसके व कर्मवीर भाऊराव पाटील अध्यापक महाविद्यालयास भेट देऊन ५२ विद्यार्थ्यांना पकडले. या कारवाया पथक प्रमुख पी.के. देशमुख, मेजर एन.बी. राऊत, ए.डी. शिंदे, प्रा. डॉ. यशवंतकर यांनी केल्या.

Web Title: 'Free' exam is 'copy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.