भालगावात औषधांचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:06 IST2021-04-23T04:06:13+5:302021-04-23T04:06:13+5:30
चितेपिंपळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भालगाव ग्रामपंचायतीतर्फे औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. शेख रुबीना यांच्या ...

भालगावात औषधांचे मोफत वाटप
चितेपिंपळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भालगाव ग्रामपंचायतीतर्फे औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. शेख रुबीना यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच छाया कोल्हे, उपसरपंच भाऊसाहेब देवकर, माजी सरपंच सुभाष डिघुळे, आरोग्यसेवक कैलाश घुशीगे, काथार, आरोग्यसेविका काळे, डोमळे, लहू थोटे, आदी उपस्थित होते.
सॅनिटायझर, मास्क तसेच सामाजिक अंतर ठेवून औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डिघुळ, सुनील गरंडवाल, शेख नाजिराबी, तुळसाबाई डांगे, सरूबाई देवकर, अश्विनी डिघुळे, शेख महमंद शेख चाॅंद, शिवाजी कदम, सुनील लांडगे, बबन डिघुळे, भाऊसाहेब नाबदे, एकनाथ डोईफोडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील पवार, लक्ष्मण देवकर, आदी उपस्थित होते. (फोटो,)