फसवणूक प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: May 15, 2015 00:48 IST2015-05-15T00:43:01+5:302015-05-15T00:48:50+5:30

उस्मानाबाद : गुत्तेदाराची नेलेली कार परत आणून न देता फसवणूक केल्याप्रकरणी कामगाराविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Fraudulent Offense | फसवणूक प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

फसवणूक प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा


उस्मानाबाद : गुत्तेदाराची नेलेली कार परत आणून न देता फसवणूक केल्याप्रकरणी कामगाराविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना ३ मे रोजी उस्मानाबाद शहरातील बँक कॉलनी परिसरात घडली़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील बँक कॉलनी भागात राहणारे (रा़मदुलपरवा ता़विजयवाडा जिक़ृष्णा ) राम बाबू बातुल्ला हे गुत्तेदारीचा व्यवसाय करतात़ त्यांच्याकडे शंकर हुडगणे (राक़ुसमंगी जिग़ुलबर्गा) हा इसम कामगार म्हणून कामाला होता़
शंकर हुडगणे याने ३ मे रोजी बातुल्ला यांना विश्वासात घेवून त्यांची कार (क्ऱएम़एच़०९- डी़एम़२६७७) ही घेवून गेला़ त्यानंतर त्यांनी कार आणून देण्याबाबत वारंवार सांगूनही त्याने कार आणून दिली नसल्याची फिर्याद बातुल्ला यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून कामगार शंकर हुडगणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक राठोड हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Fraudulent Offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.