महागड्या वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: November 2, 2014 00:23 IST2014-11-02T00:17:34+5:302014-11-02T00:23:44+5:30
औरंगाबाद : किलेअर्क पंचकुवा येथील बुद्धविहाराजवळ काही सेल्समन व सेल्सगर्ल लोकांना आकर्षक स्कीमचे आमिष दाखवीत आहेत.

महागड्या वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक
औरंगाबाद : किलेअर्क पंचकुवा येथील बुद्धविहाराजवळ काही सेल्समन व सेल्सगर्ल लोकांना आकर्षक स्कीमचे आमिष दाखवीत आहेत. कंपनीचे मेंबर बनवून त्यांना कूपन देत आहेत. या पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या सेल्समन व सेल्सगर्लवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
काही जण नागरिकांना महागड्या वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे फौजदार सुरेश खाडे यांना मिळाली. त्यावरून टीमने घटनास्थळी दाखल होऊन सखोल चौकशी केली असता युनायटेड टेली शॉप इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टचे अॅपलर्स मार्केटिंगकडून आलो आहोत. त्यांच्याकडे एक स्कीम आहे. त्यात तुम्हाला मेंबर बनविले जात आहे. मेंबरशिपचे कार्ड घेऊन आमच्या कंपनीच्या पहिल्या कार्डच्या मागील चित्रित केलेल्या वस्तूंपैकी ज्यात एलईडी टीव्ही, मिक्सर, गॅस शेगडी, इस्त्री, डीव्हीडी प्लेअर, इंडक्शन कुकर, हेअर ड्रायर, मसाजर अशा महागड्या वस्तू तुम्हास ताबडतोब येथेच मिळतील.
त्या बदल्यात ५०० रुपये द्यावे लागतील. कार्ड रिकामे निघाल्यास काहीही पैसे भरावे लागणार नाहीत. अशा महागड्या वस्तूंचे आमिष दाखविण्यास सुरुवात केली. त्यांच्या बॅगमधील वस्तूंची तपासणी केली असता, स्वस्तातील वस्तू आढळून आल्याने त्यावरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
कृष्णा राजकुमार नामदेव (२४, रा. बी-२६, वंदनानगर, इंदौर, ह.मु. बजाजनगर), शेख हमीद शेख हलीम (२३, कान्हा कुंज, भोपाळ, ह.मु. बजाजनगर), चेतन राजेश फुले (१९, रा. गणेशनगर, परतूर, ह.मु. दत्तनगर, रांजणगाव), अश्विनी सुभाष इंगळे (२४, रा. गिंभा, मोहरी, वाशिम, ह.मु. मोहटादेवी मंदिरासमोर, अयोध्यानगर), पूजा विष्णू वाळुके (२२, रा. विजयनगर, मेहकर, ह.मु. साईश्रद्धापार्क, बजाजनगर) यांच्याकडून ३६ हजार ६३७ रुपयांच्या वस्तू मिळून आल्या असून, जनतेला आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.