वृद्ध महिलेची फसवणूक
By Admin | Updated: May 30, 2017 23:48 IST2017-05-30T23:41:51+5:302017-05-30T23:48:05+5:30
जालना : आमच्या मालकाला मुलगा झाल्याने ते गरीब महिलांना साडी वाटप करत आहे, असे सांगत भामट्यांनी कलाबाई शंकर घाटेकर (६०) यांची फसवणूक केली.

वृद्ध महिलेची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आमच्या मालकाला मुलगा झाल्याने ते गरीब महिलांना साडी वाटप करत आहे, असे सांगत भामट्यांनी कलाबाई शंकर घाटेकर (६०) यांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी घडली.
गोलापांगरी येथील कलाबाई या शहरात उपचारासाठी आल्या होत्या. मामाचौकात भामट्यांनी तुम्ही अंगावरील दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले. महिलेची दागिन्याची पिशवी नजर चुकवून लंपास केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कलाबाई घाटेकर यांनी सदर बाजार पोलिसात तक्रार दिली.