शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

छत्रपती संभाजीनगरात कचरा संकलनात घोळ, सीसीटीव्हीने केला उघड; 'रेड्डी'ला २९ लाख दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:56 IST

कचरा संकलनात अपयश; कंपनीला शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन करणे आजपर्यंत जमले नाही.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा संकलनाचे काम हैदराबाद येथील रेड्डी कंपनी मागील ७ वर्षांपासून करीत आहे. कंपनीला शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन करणे आजपर्यंत जमले नाही. शहरात स्मार्ट सिटीचे ७५० कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात रेड्डी कंपनीच्या रिक्षा विविध वसाहतींमध्ये दररोज जातात का? याची तपासणी केली. त्यामध्ये एक दिवसाआड कंपनीच्या घंटागाड्या येत असल्याचे उघड झाले. त्यामुळे कंपनीला २९ लाख रुपये दंड लावण्याचा निर्णय प्रशासक यांनी घेतला.

प्रशासकांना शुक्रवारी रेड्डी कंपनीच्या भाेंगळ कारभाराचा अहवाल सादर करण्यात आला. मागील सहा वर्षांपासून कंपनी दररोज ४५० मेट्रिक टन कचरा उचलत असल्याचे दाखवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कचऱ्याचे वजन दररोज एकसारखेच आहे. कचरा कधी कमी तर कधी जास्त जमा होऊ शकतो. दिवाळीतही कचरा तेवढाच जमा होतो. त्यामुळे प्रशासकांनी रेड्डी कंपनीच्या कामाचे अवलोकन करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अनेक बाबी आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. शहराला किमान १ हजार घंटागाड्या अपेक्षित असताना कंपनी फक्त ३०० घंटागाड्यांवर काम चालवत आहे. सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत कंपनीने घंटागाड्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे. वारंवार सूचना देऊनही कंपनी गाड्यांची संख्या वाढवायला तयार नाही. घंटागाडी येत नसल्याने अनेक नागरिक कचरा विविध चौकात आणून टाकतात. त्यामुळे शहर अस्वच्छ दिसते. विशेष बाब म्हणजे कंपनीने १ टन कचरा जमा केल्यास १८६० रुपये मनपा देते. दरमहा कंपनीचे बिल ३ कोटीपर्यंत जाते. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर अस्वच्छ दिसून येते. याला फक्त रेड्डी कंपनीच जबाबदार असल्याचे समोर आले. त्यामुळे शुक्रवारी प्रशासकांनी कंपनीला २९ लाख रुपये दंड लावण्याचे आदेश दिले.

कंपनीला मुदतवाढ नाहीमागील ७ वर्षात कंपनीच्या कामात अजिबात सुधारणा नाही. त्यामुळे कंपनीचे कंत्राट भविष्यात वाढवून न देण्याचा विचार प्रशासन करीत आहे. कंपनीला वाहने उभी करण्यासाठी ८ ते १० ठिकाणी मोफत भूखंड उपलब्ध करून दिले. मनपाच्या मालकीच्या ५० घंटागाड्याही कंपनीला मोफत देण्यात आल्या. त्यानंतरही कंपनी कामात सुधारणा करायला तयार नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका