वीस मिनिटांत चौदा लाखांची घरफोडी
By Admin | Updated: July 25, 2016 01:09 IST2016-07-25T01:02:32+5:302016-07-25T01:09:10+5:30
औरंगाबाद : शहरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. सिडको एन-६ भागातील टेलिकॉम सोसायटीतील एक बंगला फोडून चोरट्यांनी

वीस मिनिटांत चौदा लाखांची घरफोडी
औरंगाबाद : शहरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. सिडको एन-६ भागातील टेलिकॉम सोसायटीतील एक बंगला फोडून चोरट्यांनी साडेअकरा लाखांच्या रोख रकमेसह सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ हजारांची नाणी चोरून नेली. रविवारी पहाटे ४.१२ ते ४.३२ दरम्यान अवघ्या वीस मिनिटांत बंगला फोडून चोरटे पसार झाले.
सिडको एन-६ मधील टेलिकॉम सोसायटीमध्ये साईकृपा या बंगल्यात गणेश नागनाथ कोंडावार (५५) हे मुलगा अनिकेत (३०), सून प्रीती (२५) आणि नात आरोही (२) यांच्यासह राहतात. कोंडावार यांचे प्रोझोन मॉल रोडवरील भारत बाजार येथे कार अॅक्सेसरिज विक्रीचे दुकान असून, ते बांधकाम ठेकेदारही आहेत. चार दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गारखेड्यातील एका खाजगी रुग्णालयात भरती होते. त्यांच्या घरी आलेल्या मावस बहिणीला नांदेड येथे देवगिरी एक्स्प्रेसने जायचे होते. त्यावेळी एका बेडरूममध्ये प्रीती या चिमुकल्या आरोहीसह गाढ झोपेत होत्या. त्यामुळे त्यांना न जागवता अनिकेत मावस बहिणीसह रेल्वेस्टेशन येथे सोडण्यासाठी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास घराला बाहेरून कुलूप लावून बाहेर पडले. त्यानंतर ४ वाजून १२ मिनिटांनी दोन चोरट्यांनी बंगल्याच्या कम्पाऊं ड वॉलवरून उड्या मारल्या. चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. तळमजल्यावरील चार रूमच्या या घरातील ज्या बेडरूममध्ये माय-लेकी झोपलेल्या होत्या, त्या रूमला चोरट्यांनी बाहेरून कडी लावली. त्यानंतर शेजारील दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी तेथील एका ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या (पान ५ वर)
माहीतगार व्यक्तींचाच या घरफोडीमागे हात असावा, असा पोलिसांना संशय आहे. कारण कोंडावार हे रुग्णालयात भरती आहेत आणि अनिकेत हा मावस बहिणीसह रेल्वेस्टेशन येथे गेल्यानंतर चोरटे बंगल्यात प्रवेश करतात.
४एवढेच नव्हेतर ज्या रूममध्ये रोख रक्कम आहे, त्या रूममधील ड्रॉवरमधून चाव्या शोधून चोरटे कपाट उघडतात आणि १४ लाखांच्या ऐवजांसह पसार होतात. अवघ्या वीस मिनिटांत ही चोरी होते... शिवाय चोरट्यांनी घरातील अन्य रूममध्ये प्रवेश केला नाही. एरव्ही चोरटे मिळेल ते झाडून सगळा ऐवज लुटण्याचा प्रयत्न करतात.
चोरट्यांनी कोंडावार यांच्या घरातील चिल्लर पैशांच्या दोन वजनदार पिशव्या घेतल्यानंतर पुन्हा कम्पाऊंड वॉलवरून उड्या मारल्या.
४विशेष म्हणजे चोरटे हे मोटारसायकलने आले होते. नाण्याच्या वजनदार पिशव्या दुचाकीवरून दोघांच्यामध्ये ठेवून ते निघून गेल्याचे घटनास्थळापासून काही अंतरावरील विविध घरांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.