मेहुण्याला चौघांनी काठीने बदडले
By Admin | Updated: June 22, 2015 00:20 IST2015-06-21T23:57:46+5:302015-06-22T00:20:20+5:30
किल्लारी : बहिणीस का मारले म्हणून मेहुण्यास चौघांनी काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना औसा तालुक्यातील जावळी येथे घडली आहे़

मेहुण्याला चौघांनी काठीने बदडले
किल्लारी : बहिणीस का मारले म्हणून मेहुण्यास चौघांनी काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना औसा तालुक्यातील जावळी येथे घडली आहे़ याप्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़
जावळी येथील व्यंकट शिंदे व त्यांच्या पत्नीचे आपसात भांडण झाले होते़ रागाच्या भरात शिंदे यांच्या पत्नीने माहेरकडील मंडळींना पतीने मारले आहे, असे सांगितले आहे़ त्यामुळे माहेरकडील रविशंकर न्हावी, ईश्वर न्हावी, रमेश न्हावी, राजकुमार न्हावी (सर्वजण रा़ दुबळगुंडी) हे जावळी येथे आले़ त्यांनी मेहुणे व्यंकट शिंदे यांना काठी व दगडाने बेदम मारले़ त्यात शिंदे जखमी झाले़ याप्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून किल्लारी पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे़ अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत़ (वार्ताहर)
किल्लारी पाटीनजीकच्या बस थांब्याजवळ अभिमन्यू हेंबाडे (रा़ जावळी) हा देशी दारूच्या ४८ बाटल्या आणून अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यावरून पोलिसांनी धाड टाकून २४ हजार रूपयांची दारू जप्त केली़ याप्रकरणी शनिवारी किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपीस अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ़ डी़एम़ पाटील करीत आहेत़