चार गावांचा पाणीप्रश्न गंभीर
By Admin | Updated: October 28, 2014 00:57 IST2014-10-27T23:58:55+5:302014-10-28T00:57:45+5:30
तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येथील तेरणा धरणात सद्यस्थितीत केवळ बारा टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने

चार गावांचा पाणीप्रश्न गंभीर
तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येथील तेरणा धरणात सद्यस्थितीत केवळ बारा टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने या चार गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. येत्या काही दिवसांत या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करावी लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
येथील तेरणा नदीवरील तेरणा धरणातून तेर, ढोकी, तडवळा आणि येडशी या चार गावांना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. यातील तेर गावाची लोकसंख्या १२ हजार ४७१, ढोकीची १४ हजार, येडशीची १९ हजार तर तडवळ्याची लोकसंख्या वीस हजार आहे. यंदा धरण परिसारत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होऊ शकलेला नाही. चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधीकरणाला दररोज ८० लाख लिटर पाण्याचा उपसा करावा लागतो. याशिवाय उस्मानाबाद शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ दोन महिने पुरू शकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे चारही गावांना जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता निमारण झाली आहे. (वार्ताहर)
तेर गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या ग्रामंचायतीचे दोन बोअर, तीन आड व दोन हातपंप या स्त्रोतांचा वापर केला जात आहे. या स्त्रोतांद्वारे गावाला सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, पुढील काळात खाजगी स्त्रोतांचे अधिग्रहण करून तेरवासियांची तहान भागविण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.
पाण्याचा अपव्यय
४तेर गावाला अगोदरच तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी जलवाहिनीला गळतीलागली असून, काही ठिकाणी वॉल्व्हमधून पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. याकडे लक्ष देऊन पाण्यचा अपव्यय थांबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.