चार हजार प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: July 13, 2014 00:28 IST2014-07-12T23:46:02+5:302014-07-13T00:28:33+5:30

सेनगाव : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे घरघर लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून ४ हजार निराधाराचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयात पडून आहेत.

Four thousand proposals awaiting approval | चार हजार प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

चार हजार प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

सेनगाव : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे घरघर लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून ४ हजार निराधाराचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयात पडून आहेत. निराधार योजना समितीची बैठक घेण्यास प्रशासनाजवळ वेळ नसल्याने योजना समितीच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
सेनगाव येथील तहसील कार्यालयात निराधार योजना विभागाचा कारभार पाहण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे व तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकच झालेली नाही. परिणामी निराधारांचे ४ हजार प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. असे असताना प्रशासन मात्र बेफीकीर असल्याचे चित्र आहे.
निराधार वयोवद्ध सहा महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या प्रस्तावाचे काय झाले? याची विचारणा करण्यासाठी तहसील कार्यालयाचा चकरा मारीत असताना सहा महिन्यापूर्वी दाखल प्रस्ताव जसेच्या तसे पडून आहेत. निराधार योजना समितीची बैठक घेण्यासही तहसील प्रशासन तयार नसल्याने या कारभारापुढे हतबल झालेले निराधार समितीचे अध्यक्ष द्वारकादास सारडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
निराधार योजनेच्या कारभाराकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली. या तक्रारीची जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी दखल घेत सेनगाव तहसीलदारांना पत्र देवून तत्काळ अहवाल सादर करीत निराधार योजना समितीची बैठक घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. तब्बल सहा महिन्यांपासून ४ हजार निराधारांचे प्रस्ताव पडून असल्याने वयोवृद्ध निराधार प्रशासनाच्या कारभाराने त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)
६ महिन्यांपासून बैठकही घेतली नाही
संजय गांधी निराधार योजनेतील ४ हजार निराधारांचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून मंजुरीच्या पतीक्षेत सेनगाव येथील तहसील कार्यालयातून पडून आहेत.
निराधार योजना विभागाचा कारभार पाहण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे व तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी निवडीचा प्रश्नही दुर्लक्षित आहे.
परिणामी निराधारांचे ४ हजार प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत.
अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानेच असा प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे.
समितीचे अध्यक्ष द्वारकादास सारडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून निराधार योजनेच्या कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी या तक्रारीची दखल घेत सेनगाव तहसीलदारांना पत्र दिले आहे. तत्काळ अहवाल सादर करीत निराधार योजना समितीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निराधार व वृद्ध लाभार्थ्यांची हेळसांड होत असताना प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Four thousand proposals awaiting approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.