शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात खंडणीवरून वादात गुन्हेगारांच्या टोळीकडून हवेत चार वेळा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:16 IST

पत्त्यांच्या क्लबचे लाखो रुपयांचे अर्थकारण या भागात सुरू असून, त्यावरून अनेकदा स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या आणि अवैध व्यावसायिकांमध्ये तणाव निर्माण होतो.

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत पुन्हा एकदा अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांच्या टोळीमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. एका कुख्यात गुन्हेगाराने पिस्तुलाद्वारे हवेत चार वेळा गोळीबार करत दहशत निर्माण केली. यामुळे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही गंभीर घटना रविवारी रात्री १०.३० वाजता मुकुंदवाडीतील एका हॉटेलसमोर घडली.

दोन वर्षांपूर्वी मुकुंदवाडीत अल्पवयीन मुलांकडून पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने उघड केली होती. या पत्त्यांच्या क्लबचे लाखो रुपयांचे अर्थकारण या भागात सुरू असून, त्यावरून अनेकदा स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या आणि अवैध व्यावसायिकांमध्ये तणाव निर्माण होतो. रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हेल्मेट नावाचा कुख्यात गुन्हेगार आपल्या टोळीसह मुकुंदवाडीतील विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या हॉटेलसमोर पोहोचला. या परिसरात राजरोसपणे अवैध दारूविक्री आणि पत्त्यांचे क्लब सुरू आहेत. हेल्मेटने तेथे जाऊन पैशांच्या कारणावरून वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातच हेल्मेट आणि त्याच्या साथीदारांनी थेट पिस्तूल काढून हवेत चार गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच (डीबी) पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक पोलिसांचे अर्थकारण?सूत्रांच्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरात काही महिन्यांपासून सुनील नावाचा गुन्हेगार पत्त्यांचे अड्डे चालवत आहे. अनेक गुन्हे दाखल असूनही त्याचे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी त्याला खंडणी मागण्यासाठी गेलेल्या उमेश नावाच्या गुन्हेगाराला त्याने बेदम मारहाण केली होती. ही घटना पोलिसांनी सोईस्कररीत्या दडवली. मात्र, त्यानंतर या दोन्ही गटांमध्ये अवैध व्यवसाय आणि हप्तेखोरीवरून शत्रुत्व आले.

टोळीतील प्रमुख गुन्हेगार सक्रियमुकेश, हेल्मेट, किशोर, बालाजी, उमेश, अमर आणि शिंदे, हे या टोळीतील गुन्हेगार रविवारी पुन्हा विमानतळाच्या भिंतीलगत गेले. तेथे त्यांनी अवैध व्यावसायिकांकडून पैशांची मागणी केली. त्यातून पुन्हा वाद उफाळून हेल्मेट व त्याच्या साथीदाराने गोळीबार केला. हेल्मेटवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर