चार पोलीस निलंबित
By Admin | Updated: July 10, 2017 00:37 IST2017-07-10T00:35:48+5:302017-07-10T00:37:26+5:30
बीड : चालकांकडून पैसे उकळून नियमबाह्यपणे वाहतुकीस मोकळीक दिल्याप्रकरणी गेवराई ठाण्यातील आणि बीड शहर वाहतूक शाखेतील एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

चार पोलीस निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चालकांकडून पैसे उकळून नियमबाह्यपणे वाहतुकीस मोकळीक दिल्याप्रकरणी गेवराई ठाण्यातील आणि बीड शहर वाहतूक शाखेतील एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नवनाथ हजारे, माणिक तांदळे [गेवराई], दिनकर माने, मच्छिंद्र राख [बीड] अशी त्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बिंदुसरा पुलावरुन वाहतूक बंद असतानाही तेथे कर्तव्य बजावण्याऐवजी चालकांकडून पैसे उकळून वाहने सोडल्याच्या तक्रारी होत्या. तसेच गढी येथूनही नियमाबाह्यपणे वाहने सोडण्याचे प्रकार झाले. या संदर्भात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वत: व कर्मचाऱ्यांकरवी खात्री केली. त्यानंतर चौघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.