लोकशाहीचे चारही स्तंभ सडले : वागळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 23:26 IST2017-03-19T23:24:07+5:302017-03-19T23:26:32+5:30
लातूर :भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले.

लोकशाहीचे चारही स्तंभ सडले : वागळे
लातूर : संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यम हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. या चारही स्तंभांची कार्यपद्धती आता भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधान, लोकशाही आणि चौथा स्तंभ’ या विषयावर व्याख्यान देताना शाहू महाविद्यालयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील होते. मंचावर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, संस्थेचे सहसचिव अनिरुद्ध जाधव, प्राचार्य एस.डी. साळुंके, अॅड. मनोहरराव गोमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अंनिसच्या वतीने प्रा. सुधीर अनवले यांना भटक्या विमुक्त कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी निखिल वागळे म्हणाले, संसद, कार्यप्रणाली, न्यायपालिका आणि माध्यमे हे चारही स्तंभ भ्रष्ट झाली आहेत. देशाच्या अधोगतीला हे चारही स्तंभ जबाबदार आहेत. माध्यमांचा आवाज भांडवलदारांच्या मदतीने दाबला जात आहे. परंतु, लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. ही लोकशाही लोकशक्तीच्या जीवावर जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. जोपर्यंत शेवटच्या माणसाचा लोकशाहीत सहभाग होत नाही, तोपर्यंत ती परिपक्व आहे, असे म्हणता येणार नाही. लोकशाहीत शेवटच्या माणसाचा सहभाग असल्याची (अधिक वृत्त हॅलो/२ वर)