होमगार्डला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
By Admin | Updated: September 11, 2014 01:10 IST2014-09-11T00:47:06+5:302014-09-11T01:10:49+5:30
वाळूज महानगर : लिंबेजळगाव येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत होमगार्डला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.

होमगार्डला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
वाळूज महानगर : लिंबेजळगाव येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत होमगार्डला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.
८ सप्टेंबरला लिंबेजळगावला गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्तव्य बजावणारे होमगार्ड विजय वाहुळे यांना आरोपी गजानन साळुंके, भागीनाथ साळुंके, ज्ञानेश्वर साळुंके व सुभाष वाकचौरे यांनी मारहाण करून शिवीगाळ केली होती.
या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच काल पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.