शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

विटा गावात डेंग्यूचे चार रुग्ण आढळले

By admin | Updated: September 2, 2014 01:54 IST

कन्नड : तालुक्यातील विटा गावातील चार रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालात डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे,

कन्नड : तालुक्यातील विटा गावातील चार रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालात डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे, तर याच गावातील काही रुग्णांवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, काही रुग्ण डेंग्यूसदृश रोगाने आजारी असल्याचा अहवाल तलाठी ए. एल. महाजन यांनी तहसील कार्यालयास दिला आहे.माजी उपसरपंच अर्जुन कोरडे यांनी सांगितले की, गावातील सुमारे २५ जण डेंग्यूसदृश तापाने आजारी आहेत. १० ते १२ जण औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत, तर काही जण गावातच आहेत व औराळा प्रा. आ. केंद्रात उपचार घेत आहेत. डेंग्यूसदृश तापाच्या आजारांमुळे गावात भीतिदायक वातावरण आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विडेकर यांनी सांगितले की, विटा गावात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हा साथरोग अधिकारी यांनीही भेट दिली आहे. औराळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले, चार रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालात डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. गावात सर्वेक्षण सुरू असून, तीन कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत. दोनदा धूरफवारणी करण्यात आली आहे. मोठा पाऊस नसल्याने दलदल वाढलेली आहे. डबक्यांमध्ये पाणी साचलेले आहे. या पाण्यामध्ये अ‍ॅबेट टाकण्यात आले आहे. शिरोडी येथेही डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तेथेही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.