चार अधिकाऱ्यांची सेलूकरांना प्रतीक्षा
By Admin | Updated: July 7, 2014 00:12 IST2014-07-07T00:12:28+5:302014-07-07T00:12:48+5:30
मोहन बोराडे, सेलू बदल्यांचे सत्र संपले तरी सेलूतील प्रमुख कार्यालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली नाही़ सेलूला बदली झालेले अधिकारी रूजू होण्यास इच्छुक नसल्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार

चार अधिकाऱ्यांची सेलूकरांना प्रतीक्षा
चिपळूण : तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातली. यावेळी बिबट्या जाड तारांच्या कंपाऊंडमध्ये अडकल्यामुळे तरुणाच्या जिवावरचे संकट हातावर निभावले. त्याच्या हाताला बिबट्याच्या नख्या लागल्या. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर बिबट्याचाही मृत्यू झाला. ही घटना आज, रविवारी सकाळी ६.४५ वाजता घडली.
अविनाश शांताराम शिर्के (वय ३५) हा तरुण दूध घालण्यासाठी जात असताना पोसरे बौद्धवाडीजवळ आला असता अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. यावेळी बिबट्याच्या नख्या त्याच्या दोन्ही हातांना लागल्या. तोल सावरताना दुसऱ्या बाजूच्या तारेच्या कुंपणावर पाठीवर पडल्यामुळे तो जखमी झाला.
जाड तारेत अडकल्यामुळे बिबट्याही गंभीर जखमी झाला. तारेतून कसाबसा बाहेर पडून काही अंतरावर तो झुडपात जाऊन पडला. त्यामुळे हल्ला करून बिबट्या पळाला, असाच सर्वांचा समज होता. या घटनेचे वृत्त सरपंचांनी वनखात्याला कळविले. त्यानुसार वनरक्षक जितेंद्र बारशिंगे व महादेव पाटील यांनी तरुणाला प्रथम कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परिसराची पाहणी करताना अर्धा किलोमीटर अंतरावर काहीजणांना एका झुडपात बिबट्या झोपलेला आढळला. अधिकाऱ्यांनी खात्री केली असता बिबट्या मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. मृत बिबट्याला पिंपळी येथील शासकीय रोपवाटिकेत आणण्यात आले. तेथे पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक सकपाळ, रामपूर येथील डॉ. संतोष निमूणकर, चिपळूण पॉलिक्लिनिकचे डॉ. लक्ष्मण सुपणे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदू पवार करीत आहेत. (प्रतिनिधी) दैव बलवत्तर असल्याने पोसरे येथील अविनाश शिर्के हा तरुण बिबट्या मादीच्या हल्ल्यातून बालंबाल बचावला. जर बिबट्या जाड तारेच्या कुंपणात न अडकता त्याच्यापर्यंत पोहोचला असता, तर अरुंद पायवाटेमुळे तो सहज बिबट्याची शिकार झाला असता. दैव पाठीशी असल्याने तो वाचला आणि त्याच्यावर झडप घालणारा बिबट्या मृत्युमुखी पडला.