चौघांनी दाखल केले सहा नामनिर्देशनपत्र
By Admin | Updated: April 8, 2015 00:50 IST2015-04-08T00:47:38+5:302015-04-08T00:50:34+5:30
उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक (डीसीसी) प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी चौघांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत़

चौघांनी दाखल केले सहा नामनिर्देशनपत्र
उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक (डीसीसी) प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी चौघांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत़ तर दुसऱ्या दिवशीही तब्बल ९७ अर्जांची विक्री झाली़
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़ अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी एक-दोन नव्हे तब्ब्ल ११३ अर्जांची विक्री झाली होती़ तर विद्यमान संचालक सुनिल चव्हाण यांनी संस्था गटातून आपले नामनिर्देशनपत्रही दाखल केले होते़ तर अर्ज विक्री-स्विकृतीच्या दुसऱ्या दिवशी ९७ अर्जांची विक्री झाली़ तर चौघा जणांनी विविध गटातून सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत़ यामध्ये सुभाष पाटोळे यांनी अनुसूचित जाती, जमाती गटातून एक, सुनिता शिंदे यांनी महिला राखीव मधून एक, राष्ट्रवादीचे सतीश दंडनाईक यांनी संस्था गटातून एक व नागरी बँक गटातून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे़ तर सुरेश देशमुख यांनी संस्था गटातून एक व नागरी बँक गटातून एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ दोन दिवसात २१० अर्जांची विक्री झाली असून, पाच जणांनी सात नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत़ दरम्यान, विद्यमान संचालकांसह अनेक मातब्बरांनी दुसऱ्या दिवशीही आपले नामनिर्देशनपत्र दाखल केलेले नव्हते़ उर्वरित तीन दिवसांमध्ये या मंडळींचेही नामनिर्देशनपत्र दाखल होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)