अन्नपदार्थांचे घेतले नमुने चार ‘मेडिकल’चे परवाने निलंबित

By Admin | Updated: November 17, 2015 00:29 IST2015-11-17T00:04:52+5:302015-11-17T00:29:10+5:30

उस्मानाबाद : फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करण्यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अणदूर (ता़तुळजापूर) येथील एका

Four 'medical' permits suspended from food samples | अन्नपदार्थांचे घेतले नमुने चार ‘मेडिकल’चे परवाने निलंबित

अन्नपदार्थांचे घेतले नमुने चार ‘मेडिकल’चे परवाने निलंबित


उस्मानाबाद : फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करण्यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अणदूर (ता़तुळजापूर) येथील एका औषध दुकानाचा परवाना औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे़ तर इतर चौघांचे परवाने काही दिवसांकरिता निलंबीत करण्यात आले आहेत़
जीवनावश्यक सुविधांपैकी एक असलेल्या औषधांची डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शननुसार आणि फार्मासिस्टच्या उपस्थितीत विक्री व्हावी, असे आदेश देण्यात आले आहेत़ त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील औषधी दुकानांना याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत़ औषधी दुकानात फार्मास्टि नसताना औषधांची विक्री केल्या प्रकरणी चालू वर्षात तब्बल ३१ औषधी दुकानांचे परवाने काही कालावधीकरिता निलंबीत करण्यात आले होते़ तर ९ जणांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे़ याच अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाकडून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विविध औषध दुकानांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती़ या तपासणी मोहिमेत चार औषध दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री होत असल्याचे दिसून आले़ यानुसार औषध प्रशासनाने काही कालावधीकरिता या औषध दुकानांचे परवाने निलंबीत केले आहेत़ यात लोहारा तालुक्यातील जेवळी येथील साई मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचा परवाना ३० दिवसांसाठी, कळंब येथील साईप्रसाद मेडिकलचा परवाना पाच दिवसांसाठी, तुळजापूर येथील लोखंडे मेडिकलचा परवाना तीन दिवसांसाठी व आशीर्वाद मेडीकलचाही परवाना काही दिवसांसाठी निलंबीत करण्यात आला आहे़ तर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिवशंभो मेडिकल दुकानाचा परवानाच रद्द करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
दिवाळी सणाच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाकडून खवा, दूध, तेल यासह इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत़ या यातील कोणत्याही नमुन्यात दोष आढळून आला तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले़

Web Title: Four 'medical' permits suspended from food samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.