नॅशनलनगरात चार लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:11 IST2017-08-13T00:11:52+5:302017-08-13T00:11:52+5:30

घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील चार लाख १७ हजारांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना नॅशनलनगर भागात घडली.

Four lakhs of homicide in the National City | नॅशनलनगरात चार लाखांची घरफोडी

नॅशनलनगरात चार लाखांची घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील चार लाख १७ हजारांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना नॅशनलनगर भागात घडली. याप्रकरणी शनिवारी चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद नाझीम सय्यद चाँद यांचे नॅशननगर भागात घर आहे. शुक्रवारी रात्री सय्यद चाँद यांच्या कुटुंबीयातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर चोरट्यांनी मुख्य गेटचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. सय्यद चाँद यांचे कुटुंबीय झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर दुसºया खोलीतील कपाटाचे लॉक तोडून १६ तोळे सोने, ३५ तोळे चांदीचे दागिणे असा एकूण चार लाख १७ हजार ऐवज चोरट्यांनी लांबविला. दरम्यान, सकाळी जाग आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे सय्यद चाँद यांच्या लक्षात आले. त्यांनी चंदनझिरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

Web Title: Four lakhs of homicide in the National City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.