भाडेकरूंची माहिती सादर न करणाऱ्या चार घरमालकांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 12, 2015 00:18 IST2015-07-12T00:14:28+5:302015-07-12T00:18:42+5:30
जालना : घर मालकांनी त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने शहरात काही ठिकाणी केलेल्या

भाडेकरूंची माहिती सादर न करणाऱ्या चार घरमालकांवर गुन्हा दाखल
जालना : घर मालकांनी त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने शहरात काही ठिकाणी केलेल्या तपाणीत चार घरमालकांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसापूर्वीच दोन घरमालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यापाठोपाठ शनिवारी एकुण चार ठिकाणी कारवाई करण्यात आल्याने घरमालकांत खळबळ उडाली आहे.
परराज्यातील तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीलोकांकडून काही अप्रिय घटना घडू नये. त्यामुळे भाडेकरू म्हणून राहत असलेल्या लोकांची माहिती पोलिसांकडे देणे बंधनकारक आहे. मात्र काही घरमालक माहिती न देता आपले घर भाड्याने देत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे. ११ जुलै रोजी राजूरेश्वर कॉलनीतील चार घरमालकांवर भाडेकरूंची माहिती न दिल्याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात वेग वेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.