फुलंब्री तालुक्यात चार ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:37+5:302021-01-08T04:09:37+5:30
फुलंब्री तालुक्यात ५३ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या यात ४६७ उमेदवार संख्या आहे. पण ४ ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. तर ...

फुलंब्री तालुक्यात चार ग्रामपंचायत बिनविरोध
फुलंब्री तालुक्यात ५३ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या यात ४६७ उमेदवार संख्या आहे. पण ४ ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. तर दोन गावांत ८ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे आता ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नाकीब, लालवन, कान्हेगाव, सोनारी बु. या गावाच्या नागरिकांच्या समजदारीमुळे
निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या. तसेच रेलगाव येथील दोन तर महाल किन्होळा येथील सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. अशा एकूण ३५ ग्रामपंचायत सदस्य निवडले गेले.
चौकट
गावात सौहार्दपूर्ण वातावरण राहावे म्हणून बिनविरोध
गावातील वातावरण चांगले राहावे, आपसात सामंजस्य अबाधित राहावे, निवडणुकीचा खर्च टाळावा, याचा विचार करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. याला प्रतिसाद मिळाला यात सर्व पक्षाच्या लोकांचा समावेश करून निवडणूक बिनविरोध केली. गाव विकासाच्या दृष्टीने हे एक चांगले पाऊल आहे, असे मत चिंचोली नकीब येथील डॉ. मच्छिंद्र जंगले यांनी व्यक्त केले. तर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याकरिता गावातील नागरिकानी एकजुटीने निर्णय घेतला. याला सर्वसम्मती मिळाली व निवडणूक बिनविरोध झाली.
याचा फायदा विकास कामाला होणार आहे. अशी माहिती सोनारी येथील बाबूराव दाभाडे यांनी दिली.
फोटो आहे.