आलूर येथील आरोग्य केंद्रात चौघांचा गोंधळ
By Admin | Updated: September 6, 2015 23:55 IST2015-09-06T23:46:46+5:302015-09-06T23:55:44+5:30
येणेगूर : रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत रुग्णसेवेचाच विषयावरून आरडाओरड करीत गावाच्या राजकारणावरून एका महिला डॉक्टरला शिवीगाळ करीत विनयभंग

आलूर येथील आरोग्य केंद्रात चौघांचा गोंधळ
येणेगूर : रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत रुग्णसेवेचाच विषयावरून आरडाओरड करीत गावाच्या राजकारणावरून एका महिला डॉक्टरला शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना शनिवारी सायंकाळी आलूर (ता़उमरगा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली़ या प्रकरणी आलूर येथील चौघांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी सायंकाळी रुग्ण कल्याण समितीची बैठक सुरू होती़ त्यावेळी गावातीलच शिरीष पाटील, आत्माराम धोत्रे, जितेंद्र पोतदार, महादेव बिराजदार हे चौघे बैठकीत घुसले़ त्यावेळी रुग्णसेवेचा विषय काढून आरडाओरड करीत प्रश्न विचारू लागले़ महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रश्नांवर उत्तरे देत असताना वरील चौघांनी गावातील राजकारणाचा राग मनात धरून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच त्यांचा विनयभंग करून रुग्णालयाच्या खिडकीच्या काचा फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले़ याबाबत पीडित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोउपनि एस़बीक़दम हे करीत आहेत़ (वार्ताहर)