चौपदरीकरणाची वृक्षतोड सॉमीलच्या पथ्थ्यावर
By Admin | Updated: December 23, 2015 23:58 IST2015-12-23T23:08:18+5:302015-12-23T23:58:38+5:30
शिरीष शिंदे , बीड एक वृक्ष लागवड करुन त्याच्या संगोपणास कमीत कमी १०० वर्षांचा कालावधी लागतो मात्र धुळे-सोलापुर महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु झाले असून

चौपदरीकरणाची वृक्षतोड सॉमीलच्या पथ्थ्यावर
शिरीष शिंदे , बीड
एक वृक्ष लागवड करुन त्याच्या संगोपणास कमीत कमी १०० वर्षांचा कालावधी लागतो मात्र धुळे-सोलापुर महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु झाले असून या मार्गावर अडसर ठरणाऱ्या जुन्या वृक्षांची तोड झाली आहे. विकास कामाच्या नावाखाली गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्गावरील लहान-मोठी अशी एकुण दोन हजार तिनशे दोन वृक्षांची कत्तल केल्याची धक्कादायकबाब समोर आली असून, ही वृक्षतोड सॉ मील चालकांच्या पथ्थ्यावर पडली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्यानंतर या मार्गावरील वृक्ष कामासाठी अडसर ठरली. त्यामुळे फोरलेनच्या कामाचे कंत्राट ज्यांना मंजुर झाले आहे त्यांनी शासनाची रितसर परवानगी घेऊन वृक्ष व झाडे तोडण्याचा मार्ग सुकर करुन घेतला. कंत्राटदार कंपनी स्वत: वृक्ष व झाडे तोडण्याचे काम करु शकत नसल्याने बीड व गेवराई तालुक्यातील सॉमील धारकांना सदरील वृक्ष तोडण्यास सांगितले.
त्यानुसार सहा महिन्याच्या कालावधीत एकुण दोन हजार तिनशे दोन वृक्ष तोडण्यात आली आहेत. विकास कामाच्या नावाखाली निर्सगाचा ऱ्हास होत चालला होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील शहरी भागांचे विस्तारीकरण होत असल्याने नियम धाब्यावर बसवून झाडे सर्रासपणे तोडली जात आहे. त्यामुळे शहरी भागात झाडांची संख्या फारशी नाही. हा देखील विकासाचा भाग आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गावरील १५० वर्षाहून अधिक जुनाट वृक्षांची तोड केली जात आहे. पहायला गेले तर ही फार गंभीर बाब आहे.
झाडांचे महत्व समजेना
निर्सगाचा समतोल बिघडत चालल्याने अख्या मराठवाड्याला दृृष्काळाशी सामना करावा लागत आहे. ग्लोबल वार्मिंगची चर्चा पुर्वी जागतीक स्तरावर व्हायची मात्र आता याचे परिणाम ग्रामीण भागातही दुष्काळ स्वरुपात पहावयास मिळत आहेत. औद्यागिकीकरण झपाट्याने वाढले आहे मात्र निर्सगाकडे सर्वांची डोळेझाक केली जात असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत मात्र भविष्यात पाणी मिळणेही कठीण होईल याची अनेकांना जाण नाही.