चार दिवसानंतर मृतदेह सापडला
By Admin | Updated: August 31, 2014 01:11 IST2014-08-31T00:30:53+5:302014-08-31T01:11:15+5:30
गेवराई : तालुक्यातील तांदळा येथे मंगळवारी रात्री विठ्ठल किसन सिरसट (वय ५५) हे पुरात वाहून गेले होते.पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते.

चार दिवसानंतर मृतदेह सापडला
गेवराई : तालुक्यातील तांदळा येथे मंगळवारी रात्री विठ्ठल किसन सिरसट (वय ५५) हे पुरात वाहून गेले होते.पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या बचाव पथकाने शुक्रवारी सकाळी शोध घेतला असता सिरसट यांचा मृतदेह सैदापूर (ता. गेवराई) येथील तलावात आढळून आला.
मागील चार दिवसांपासून प्रशासन गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेत होते. बचाव कार्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागली होती. सतर्कतेचा इशारा ग्रामस्थांना देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसापासून गेवराई परिसरात पाऊस पडत आहे.
सुर्यदर्शन नाही
जोरदार पावसाला सुरुवात झाली असून संततधार सुरुच आहे. शनिवारी काही ठिकाणी पाऊस पडत होता. त्यामुळे जवळपाच चार दिवसापासून सुर्यदर्शन नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)