चार कोटींचा आराखडा

By Admin | Updated: December 20, 2015 23:49 IST2015-12-20T23:45:25+5:302015-12-20T23:49:48+5:30

तुळजापूर : अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी

Four crore plan | चार कोटींचा आराखडा

चार कोटींचा आराखडा


तुळजापूर : अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असून, या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने तब्बल ४ कोटी १९ लाख चार हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जानेवारी ते ३१ मार्च २०१६ या कालावधीसाठी असलेल्या या आराखड्यात २७२ खाजगी विहिरी अधिग्रहणासह खोलीकरण, नवीन विंधन विहिरी, नळ योजना आदी बाबींचाही समावेश आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या आराखड्यात तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे आठ खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय अमरावतीवाडी, सोमलिंग तांडा, आलियाबाद येथे प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करणे आवश्यक ठरणार आहे. तसेच अपसिंगा ६, आरळी ५, इरकल ३, बारुळ ४, बसवंतवाडी, भातंब्री, कुंभारी, सिंदगाव, लोहगाव, बोरी येथे देखील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आहे. चव्हाणवाडी, बसवेश्वरनगर (चिवरी), चिवरी गाव, दहिटणा, इंदिरानगर, देवऋषी, वागदरी तांडा, देवसिंगा नळ, धनेगाव, शेटेवस्ती, धोत्री, दिंडेगाव, फुलवाडी, ब्रह्मानगर तांडा (देवसिंगा तूळ), गुजनूर, शहापूर, हंगरगा नळ, हंगरगा तूळ, भीमदरा तांडा, (होर्टी), वडाचा तांडा, बालाजीनगर, राणाप्रताप तांडा (जळकोट), मारवाडी तांडा (जळकोट), कदमवाडी, कोरेवाडी, मगरवाडी, कवठा, कार्लातांडा, घट्टेवाडी, कात्री, केशेगाव, कोरेवास्ती, खडकी, धोत्री, घोडकीतांडा, नरवडे तांडा, पाटील तांडा, आमराईताांड, भोईटेवस्ती, शिमदरातांडा, कसई, मानेवाडी, खंडाळकरवाडी, तडवळा, मुर्टा, चिंचखोरीतांडा, मैलारपूर तांडा, नांदुरी, निलेगाव, निलेगाव तांडा, खडकवाडी, रामतीर्थ, खोताचीवाडी, मुक्तीनगर, सरडेवाडी, शिरगापूर, शिवाजीनगर, सुरतगाव, वडगाव काटी,वरणेवाडी, खुटेवाडी, काटीतांडा, येडोळा, दखनीतांडा, येडोळा तांडा आदी गावात प्रत्येक एक विहीर खासगी अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. काही ठिकाणी आवश्यक तेथे दोन प्रस्ताव आहेत. हंगरगा नळ, होनाळा, मंगरूळ येथे तीन प्रस्ताव आहेत. (वार्ताहर)

Web Title: Four crore plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.