शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

वर्षाला चार तपासण्या, फिटनेस प्रमाणपत्र, तरीही ‘एसटी’ आगीच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 12:38 IST

दुर्घटना सुरूच : चौकशी समिती नियुक्त; बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची सूचना

औरंगाबाद : गेली ७४ वर्षे सेवा देत ‘एस.टी. बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास’ अशी ओळख ‘एस.टी.’ने निर्माण केली आहे. अपघात टाळण्यासाठी प्रत्येक एस.टी.चे वर्षातून एकदा फिटनेस प्रमाणपत्र घेतले जाते. शिवाय वर्षातून तीन वेळा सर्व तपासण्या आणि दररोज एकदा तपासणी केली जाते. मात्र त्यानंतरही ‘एसटी’ला आग लागण्याच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे या सगळ्या तपासण्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नाशिकच्या आगार क्र. १ मधून रविवारी रात्री नाशिक-हिंगोली ही बस रवाना झाली होती. रात्री १ वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे बस असताना अचानक इंजीनमधून धूर निघू लागला. चालक आर. डी. लोखंडे यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ बस थांबवली. वाहक एम. पी. नरोळे यांनी २६ प्रवाशांना खाली उतरवले. याच वेळी संपूर्ण बस आगीने वेढली गेली. विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक संतोष घाणे, उपयंत्रअभियंता वावळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

कारण शोधले जाईलनाशिक - हिंगोली एसटीला नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली, याचा शोध घेतला जाईल. यांत्रिकी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल. अधिक बारकाईने बसगाड्यांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची सूचना आगार व्यवस्थापकांना करण्यात येईल, असे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.

यापूर्वी २४ एप्रिलची घटनासिल्लोड - जळगाव महामार्गावरील जगप्रसिद्ध अजिंठा घाट चढत असताना एसटी महामंडळाच्या मुक्ताईनगर - औरंगाबाद बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने बसमध्ये प्रवास करीत असलेल्या जवळपास ४० प्रवाशांना बसच्या खाली उतरल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटी