चार तंटामुक्ती समिती अध्यक्षांची निवड
By Admin | Updated: August 17, 2014 00:16 IST2014-08-17T00:16:40+5:302014-08-17T00:16:40+5:30
कनेरगाव नाका : कनेरगाव नाका, कानडखेडा बु., आंबाळा व फाळेगाव येथे तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

चार तंटामुक्ती समिती अध्यक्षांची निवड
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका, कानडखेडा बु., आंबाळा व फाळेगाव येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा घेवून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.
कनेरगाव नाका येथे रामचंद्र गावंडे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच संतोष गावंडे, भांडारकर, मुख्याध्यापक पवार यांच्यासह ग्रामस्थ हजर होते. कानडखेडा बु. येथे तंटामुक्त अध्यक्षपदी वामनराव भालेराव तर उपाध्यक्षपदी गजानन भालेराव यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच ज्योती भालेराव, ग्रामसेवक संजय गवळी यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.
आंबाळा येथे अंबादास इंगोले व बंडू लांडगे यांची अनुक्रमे तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच नामदेवराव इंगोले, केदार इंगोले, रामप्रसाद इंगोले, पंढरी लांडगे, बळीराम लांडगे, गजानन इंगोले, सीताराम लांडगे, सदाशिव इंगोले, ज्ञानबा लांडगे, अशोक इंगोले, प्रकाश इंगोले, गजानन इंगोले, शांतीराव इंगोले आदी हजर होते.
फाळेगाव येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी उत्तम आसोले तर उपाध्यक्षपदी विठ्ठलराव जहिरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच पुरूषोत्तम गुंजकर, नंदकिशोर भांडारकर, वाघोजी आसोले, एकनाथ कुबडे, सत्तारखॉ पठाण, सुरेश जहिरव, नामदेव आसोले, नामदेव डवले, सोनाजी आसोले, सुनील टोंचर, शेख मदार, रामकिशन गुंजकर, ज्ञानेश्वर पारिसकर, महेबूब पठाण, कळनु खंदारे, भीवसन मगर, हरिभाऊ धवसे, लिंबाजी बोडखे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)