चार उमेदवारांची निवडणुकीतून माघार
By Admin | Updated: October 1, 2014 00:33 IST2014-09-30T23:42:34+5:302014-10-01T00:33:35+5:30
परभणी: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून चारही विधानसभेतील प्रत्येकी १ अशा चार उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली.

चार उमेदवारांची निवडणुकीतून माघार
परभणी: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून चारही विधानसभेतील प्रत्येकी १ अशा चार उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली. बुधवार हा उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
उमेदवारी अर्ज परत घेण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी परभणी विधानसभा मतदारसंघातील अनिल माणिकराव मुद्गलकर, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील किशोरी श्रीकांत भोसले, पाथरी विधानसभा मतदारसंघातील मेघा मोहन फड व जिंतूर विधानसभा मतदारसंघातील शबाना बेगम इसाक शेख या चार अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. आता उमेदवारांना बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत.
त्यानंतर लागलीच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर तातडीने निवडणूक विभागाकडून पोस्टल मतपत्रिका तयार करण्यात येणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)