दोन चोरट्यांकडून चार दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:01+5:302021-07-09T04:05:01+5:30

किराडपुरा येथील सय्यद सुलेमान सय्यद मुर्तुजा यांची मोटारसायकल २ जुलै रोजी रात्री घराजवळून चोरी झाली होती. याविषयी त्यांनी ...

Four bikes seized from two thieves | दोन चोरट्यांकडून चार दुचाकी हस्तगत

दोन चोरट्यांकडून चार दुचाकी हस्तगत

किराडपुरा येथील सय्यद सुलेमान सय्यद मुर्तुजा यांची मोटारसायकल २ जुलै रोजी रात्री घराजवळून चोरी झाली होती. याविषयी त्यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सरवर शेख आणि उपनिरीक्षक अय्युब पठाण, संपत राठोड, शेख हारुण, संजय गावंडे, हकीम शेख यांच्या पथकाने तपास सुरू केला असता ही दुचाकी चोरी शेख रिजवान याने केल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी संशयावरून रिजवानला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार शेख शाहेद आणि समीर यांच्या मदतीने शहरात मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीच्या चार मोटारसायकल हस्तगत केल्या. यापैकी एका दुचाकीवर बनावट क्रमांक टाकलेला होता.

Web Title: Four bikes seized from two thieves