मराठवाड्यातील चार मोठी धरणे मृतसाठ्यातच
By Admin | Updated: August 17, 2016 00:53 IST2016-08-17T00:23:00+5:302016-08-17T00:53:08+5:30
औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपल्यावरही मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहे

मराठवाड्यातील चार मोठी धरणे मृतसाठ्यातच
औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपल्यावरही मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहे. याशिवाय येलदरी आणि मनार प्रकल्पातही दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागात दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.
भीषण दुष्काळानंतर मराठवाड्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक परिस्थिती सुधारली. तसेच नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणातही बऱ्यापैकी जलसाठा झाला; परंतु अजूनही मराठवाड्यातील अनेक प्रकल्प रिकामेच आहेत. त्यातही मोठ्या प्रकल्पांची अवस्था वाईट आहे. मराठवाड्यात एकूण अकरा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी ४० टक्के साठा आहे. विभागातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव या चार धरणांमध्ये मात्र शून्य टक्के साठा आहे. तसेच येलदरी धरणात ९ टक्के, मानार धरणात १० टक्केच साठा आहे. विभागात केवळ विष्णुपुरी या एकाच प्रकल्पात ८८ टक्के असा मोठा जलसाठा झाला आहे.