चार अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळयात

By Admin | Updated: June 9, 2015 00:22 IST2015-06-09T00:22:42+5:302015-06-09T00:22:42+5:30

जालना : जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व मोटारसायकलची चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे

Four Atal Offenders Police | चार अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळयात

चार अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळयात


जालना : जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व मोटारसायकलची चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या चारही आरोपींना ७ जून रोजी अटक करण्यात आली.
आरोपींमध्ये राजसिंग श्यामसिंग कलाणी (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, टिव्ही सेंटर समोर जालना), शाहरूख जगरूल पठाण (वय २५, रा. शिवाजी चौक मंठा), शेख माबुद शेख महेबुब (वय १९, रा. जवाहर कॉलनी मंठा), कैलास सवाईराम जाधव (वय २२, अचानक तांडा वरखेड) यांचा समावेश आहे. या आरोपींनी जालना शहर, रामनगर व मंठा येथे चोऱ्या केल्याची कबूली दिली, असे पोलिसांनी सांगितले.
कैलास राठोड याने आठ मोटारसायकल चोरून आणल्याची कबूली दिली. त्यावरून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींवर कदीम जालना, मौजपुरी, मंठा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींच्या ताब्यातून सोन्याचांदीचे दागिने, किराणा सामान, मोबाईल व आठ मोटारसायकल असा एकूण ४ लाख ९४ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक सुरेश भाले, विश्वनाथ भिसे, शांतीलाल दाभाडे, टी.सी. राठोड, फुलसिंग घुसिंगे, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, कैलास कुरेवाड, रामेश्वर बचाटे, भालचंद्र गिरी, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, वैभव खोकले, राहुल काकरवाल, विष्णू कोरडे, सोमनाथ उबाळे, लखन पचलोरे, समाधान तेलंग्रे, रामदास जाधव, एन.आर. राठोड यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Four Atal Offenders Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.