नायगाव दरोड्यात चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:39 IST2017-07-18T00:35:39+5:302017-07-18T00:39:42+5:30

नांदेड: नायगाव तालुक्यातील राहेर येथे १० जुलै रोजीच्या रात्री प्रल्हाद आनंदराव इंगळे यांच्या घरी चौघांनी दरोडा टाकला होता़ यावेळी कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाणही केली होती़

Four arrested in Naigaon Dock | नायगाव दरोड्यात चौघांना अटक

नायगाव दरोड्यात चौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: नायगाव तालुक्यातील राहेर येथे १० जुलै रोजीच्या रात्री प्रल्हाद आनंदराव इंगळे यांच्या घरी चौघांनी दरोडा टाकला होता़ यावेळी कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाणही केली होती़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने चार दरोडेखोरांना पकडले़ त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे़
प्रल्हाद इंगळे हे घरात झोपलेले असताना, रात्री एक वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला़ इंगळे यांच्या गळ्याला चाकू लावला़ तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली़ त्यानंतर कपाटातील रोख रक्कम, सोने-चांदी असा मिळून ७ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात कुंटूर ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे तपास देण्यात आला होता़
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली अन् साथीदारांची नावेही सांगितली़ पोलिसांनी या प्रकरणात चार दरोडेखोरांना अटक केली आहे़ त्यामध्ये आनंदा देवराव भोसले (रा़चिखली ताक़ंधार), इंदल माधवराव शिंदे (रा़लालवंडी ता़ नायगाव), विकास विश्वनाथ जोगदंड (रा़बीड) व कविताबाई आनंदा भोसले यांचा समावेश आहे़
त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोने-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत़ सोमवारी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संदीप गुरमे यांनी पथक तयार केले होते़ त्यात पोउपनि दिनेश काशीद, विनायक शेळके, माणिक हंबर्डे, गुंडेराव करले, रवी बाबर, गजानन बयनवाड, योगेश शहाणे, विवेक पाटील, संतोष कुमरे, प्रकाश तमलूरे, बालाजी राठोड, विजय आऊलवार, भगवान कोत्तापल्ले यांचा समावेश होता़

Web Title: Four arrested in Naigaon Dock