धनगावात चार एकर उसाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:05 IST2021-03-13T04:05:17+5:302021-03-13T04:05:17+5:30
जायकवाडी : धनगाव शिवारात असलेल्या चार एकर उसाच्या शेतीला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात शेतकरी प्रभाकर बाबूराव ...

धनगावात चार एकर उसाला आग
जायकवाडी : धनगाव शिवारात असलेल्या चार एकर उसाच्या शेतीला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात शेतकरी प्रभाकर बाबूराव बोबडे यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत शेतकरी बोबडे यांनी सांगितले की, धनगाव शिवारात माझी चार एकर शेती आहे. त्यात तोडणीवर आलेल्या चार एकरातील उसाला बुधवारी मध्यरात्री आग लागली. त्यामुळे चार एकरातील उभा असलेला ऊस जळाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच माझ्यासह गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी मदत केली. मात्र, यात त्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी बोबडे यांनी केली आहे.
फोटो कॅप्शन :
धनगाव शिवारात चार एकर उसाला आग.