निमाई हॉस्पिटलची पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:04 IST2021-07-19T04:04:26+5:302021-07-19T04:04:26+5:30
हे हॉस्पिटल औरंगाबादच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांसाठी वरदान ठरणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या सोहळ्यात आरोग्यमंत्री ...

निमाई हॉस्पिटलची पायाभरणी
हे हॉस्पिटल औरंगाबादच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांसाठी वरदान ठरणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या सोहळ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑनलाईन संवाद साधला. हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष मद्रेवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्वांत मोठे २०० खाटांचे माता व बाल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू करण्याचा संकल्प केला आहे. हे हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असेल व औरंगाबादमधील १० मजल्यांचे हे पहिलेच राहील. संपूर्ण सेंट्रल एयर कंडिशन हे हॉस्पिटल असेल. यात नवजात शिशूसाठी ५५ बेडस्चा अतिदक्षता विभाग आहे. त्याचप्रमाणे ३० बेडस् बाल रुग्ण अतिदक्षता विभागात असणार आहेत. विशेष म्हणजे गर्भावस्थेपासून ते हृदयाच्या शस्त्रक्रियेपर्यंत एकाच ठिकाणी उपचार मिळणार आहे. राज्यातील पहिली ह्युमन मिल्क बँक निमाईमध्ये असेल. यावेळी बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शाम खंडेलवाल, डॉ. दत्ता कदम यांच्यासह शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कॅप्शन
हडकोतील राधिका सेवा ट्रस्टच्या निमाई हॉस्पिटलची पायाभरणी करताना संचालक डॉ. संतोष मद्रेवार, कालिका स्टीलचे चेअरमन घनश्याम गोयल, अन्य मान्यवर उपस्थित होते.