कुजलेल्या अवस्थेतील प्रेत आढळले

By Admin | Updated: September 10, 2014 00:46 IST2014-09-10T00:29:07+5:302014-09-10T00:46:42+5:30

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शिवेश्वरवाडी भागात ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यात मगन कुठूंबरे (८०) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

Found the body of rotten prostrate | कुजलेल्या अवस्थेतील प्रेत आढळले

कुजलेल्या अवस्थेतील प्रेत आढळले



आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शिवेश्वरवाडी भागात ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यात मगन कुठूंबरे (८०) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना गणपती विसर्जनाच्या दिवशीच घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.
कुजलेल्या अवस्थेतील हे प्रेत आढळून आल्यानंतर सुरूवातीला या मृतदेहाची ओळख पटली नाही. बंधाऱ्यातील पाण्यात हे प्रेत तरंगत असताना काही जणांनी पाहिले. ही खबर गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी व पोलिसांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास प्रेत बाहेर काढले. हसनाबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एन.वाय. अंतराप यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. यावेळी सहायक उपनिरीक्षक कुरेवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष सत्तार शेख, सरपंच नामदवे सरोदे आदी होते. प्रेत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच घटनास्थळी आणून शवविच्छेदन केले. (वार्ताहर)

Web Title: Found the body of rotten prostrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.