शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

चेअरमनच्या घराची तोडफोड, ठाण्यातून पळालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:29 IST

बारा तासांत दोन गुन्हे दाखल, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली

छत्रपती संभाजीनगर : वैयक्तिक वादातून दोन साखर कारखान्यांचे चेअरमन व भाजपचे पदाधिकारी सतीश जगन्नाथराव घाटगे (५२, रा. शहानूरवाडी) यांच्या घरात घुसून त्यांचेच नातलग श्यामसुंदर वसंतराव उढाण (४७, रा. गुरुसहानी नगर, एन-४) यांनी चाकूने धमकावत सामानाची नासधूस केली. वाहनाची तोडफोड केली. ६ जानेवारीला मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या प्रकारानंतर उढाण यांनी पोलिस ठाण्यातून पळ काढला होता. त्यात पोलिसांनी त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करून गुरूवारी अटक केली.

दि. ६ रोजी मध्यरात्री उढाण यांनी घाटगे यांच्या घराचे सेंट्रल लॉक तोडून प्रवेश केला. तोडफोड केली. तळमजल्यावरुन शिवीगाळ करुन त्यांनी घाटगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस पोहोचल्यानंतरही त्यांनी हातातील शस्त्राने कारच्या काचा फोडल्या. हा सर्व प्रकार करताना उढाण नशेत होते, असेही तक्रारीत नमूद आहे. जवाहरनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात बसवले. त्यानंतर घाटगे यांच्या तक्रारीवरून उढाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बारा तासांत दोन गुन्हे दाखलपोलिसांनी ताब्यात घेऊन उढाण यांना पोलिस ठाण्यात नेऊन बसवले. पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडत होते. मात्र, त्याचवेळी अटकेच्या भीतीने उढाण यांनी लघुशंकेचा बहाणा करून ठाण्यातून पळ काढला होता. याप्रकरणी अंमलदार राजू पवार यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घाटगे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात गुरुवारी जवाहरनगर पोलिसांनी उढाणचा शोध घेऊन अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chairman's House Vandalized; Ex-Council Member Arrested After Thane Escape

Web Summary : Following a property dispute, Shyam Sundar Udhan vandalized Chairman Satish Ghatge's house, threatened him, and damaged vehicles. Udhan fled police custody but was later apprehended and remanded to police custody. The incident occurred in Chhatrapati Sambhajinagar.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर