माजी सैनिकाने ' लिव्ह ईन ' मध्ये दिला धोका, प्रेयसीची बलात्काराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 14:02 IST2017-08-06T14:00:20+5:302017-08-06T14:02:42+5:30
सात वर्षापासून लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरूद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

माजी सैनिकाने ' लिव्ह ईन ' मध्ये दिला धोका, प्रेयसीची बलात्काराची तक्रार
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ६ : सात वर्षापासून लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरूद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले.
लहू कडाजी नाटकर (३३,रा.जालना) असे आरोपीचे नाव आहे.याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडिता आणि आरोपी यांची अनेक वर्षापासूनची मैत्री आहे. आरोपीने पीडितेला पुंडलिकनगर परिसरात घर भाड्याने घेऊन दिले आणि तेथे ते सात वर्षापासून राहात. या काळात त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यामुळे पीडिता आज पाच महिन्याची गर्भवती आहे. यामुळे पीडितेने त्यास लग्नासाठी सतत आग्रह धरला. सुरवातीला त्याने तिला आज करू,उद्या करू असे सांगून वेळ मारून नेली. मात्र बाळाच्या जन्मापूर्वी आपला विवाह होणे आवश्यक असल्याचे पीडितेने त्यास सांगताच, आरोपीने तिला लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. शिवाय यापुढे लग्नाचा विषय काढायचा नाही,असे म्हणून तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी प्रियकराने आपला विश्वासघात करीत अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड हे तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले. आरोपींला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडिता ही येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करते. आरोपी जालना येथून येथे येत असे आणि तिच्यासोबत राहात.