माजी सरपंचाच्या शेतात डायनामोवर चोरट्यांनी केला हात साफ

By Admin | Updated: May 3, 2014 14:49 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:49:27+5:30

परिसरातून विहिरीवरील पाणीपंपातील तांब्याची तार व जनरेटरमधील डायनामो चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एकाच रात्री चार ठिकाणी पानवडोद परिसरात चोरी झाल्याने चोरट्यांची मोठी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचे वाटत आहे.

In the former Sarpanch's field, Dynamo steals his hands | माजी सरपंचाच्या शेतात डायनामोवर चोरट्यांनी केला हात साफ

माजी सरपंचाच्या शेतात डायनामोवर चोरट्यांनी केला हात साफ

पानवडोद : परिसरातून विहिरीवरील पाणीपंपातील तांब्याची तार व जनरेटरमधील डायनामो चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एकाच रात्री चार ठिकाणी पानवडोद परिसरात चोरी झाल्याने चोरट्यांची मोठी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचे वाटत आहे.
यामुळे शेतकरी घाबरले आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात माजी सरपंच गणेश दौड यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.
माजी सरपंच डॉ. गणेश दौड यांच्या पानवडोद गोळेगाव रस्त्यावरील शेतामधील विहिरीवर असलेल्या जनरेटरच्या मधील तार डायनामो तार काढून नेली, तर त्यांच्या शेजारील गजानन दगडूबा दौड यांच्या विहिरीवरील पाणीपंपाची तांब्याची तार चोरून नेली आहे.

दावरवाडी परिसरात उन्हाचे प्रमाण वाढले
दावरवाडी : सध्या दावरवाडी परिसरात उन्हाचा पारा वाढला असून सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा सुरू होतात. दुपारी सूर्य आग ओकतो असे वाटत असून दुपारी गावातील परिसरासह पैठण-पाचोड रस्त्यावर वाहनधारकही कमी प्रमाणात बाहेर पडत आहेत. रस्त्यावर उन्हाच्या तीव्रतेमुळे शुकशुकाट दिसत आहे.
दुपारच्या वेळी जो-तो उन्हाच्या भीतीने थंडगार सावलीचा आश्रय घेतानाचे चित्र सध्या परिसरात पाहावयास मिळत आहे.

इस्माईल इमाम यांचे निधन
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील अंमळनेर येथील इस्माईल इमामखा पठाण (६५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार जमील पठाण यांचे ते वडील होत.

रुख्मणबाई मनोहर यांचे निधन
बिडकीन : कृष्णापूर येथील रहिवासी रुख्मणबाई त्र्यंबक महानोर (७५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी एस.टी. मनोहर यांच्या मातोश्री होत.

Web Title: In the former Sarpanch's field, Dynamo steals his hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.