माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग शनिवारी औरंगाबाद शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:38 IST2017-12-22T00:36:43+5:302017-12-22T00:38:42+5:30
शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘पद्मविभूषण शरद पवार : द ग्रेट एनिग्मा’ या माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरित्रग्रंथाचे विमोचन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते होणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग शनिवारी औरंगाबाद शहरात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘पद्मविभूषण शरद पवार : द ग्रेट एनिग्मा’ या माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरित्रग्रंथाचे विमोचन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी (दि. २३) दुपारी ३ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थितीत असणार आहे, तर एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, अंकुशराव कदम उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच असल्याचे संयोजकांनी कळवले आहे.