शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वैजापूरचे माजी आमदार आर.एम. वाणी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 11:36 AM

Shiv Sena former MLA R.M. Vani : नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकिय प्रवास राहिला.

ठळक मुद्देपाण्यासाठी आंदोलनाची राज्यपालांनी घेतली होती दखल सलग तीन वेळा वैजापूरचे प्रतिनिधित्व केले

वैजापूर :  जेष्ठ शिवसेना ( Shiv Sena ) नेते व वैजापुरचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम. वाणी (८४) ( R.M. Vani ) यांचे मंगळवारी रात्री औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांनी १९९९ ते २०१४ या कालावधीत सलग तीन पंचवार्षिकमध्ये विधानसभेत वैजापूर मतदारसंघाचे शिवसेनेतर्फे प्रतिनिधीत्व केले. 

औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आर.एम. वाणी या नावाने सुप्रसिद्ध असेलेल्या वाणी यांनी १९८४ ते १९९४ या कालावधीत वैजापूरचे नगराध्यक्षपद भुषवले. पन्नास वर्षाच्या राजकिय कार्किर्दीत वाणी यांनी शहरासह ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले. नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातुन पाणी आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सलग ३९ दिवस आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्यपालांनी आंदोलकांची भेट घेतली. प्रशासनावर त्यांचा चांगला वचक होता. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकिय प्रवास राहिला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

वैजापूर येथील येवला रोडवरील निवासस्थानी अंत्य दर्शनानंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल. अंत्ययात्रा निवासस्थानाहून येवला रोड - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा - संकट मोचन हनुमान मंदिर - टिळक रोड - जामा मस्जीद - पाटील गल्ली मार्गे वैजापुर अमरधाम या मार्गे निघेल. येथे सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाDeathमृत्यू