शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणींचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:45 IST

किशनचंद तनवाणी मुंबईत उद्धव ठाकरेंना भेटणार

ठळक मुद्देभाजपचे आ. अतुल सावे थांबविण्यासाठी प्रयत्नशीलशिवसेना आमदार संजय शिरसाट मित्रासाठी आग्रही

औरंगाबाद : मूळचे शिवसेनेचे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष असलेले किशनचंद तनवाणी हे भाजपला राम राम ठोकून शिवबंधन बांधणार हे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती आहे. 

भाजपचे शहराध्यक्ष म्हणून पक्षाने त्यांना दिलेले वाहन त्यांनी सोमवारी दुपारी परत केल्याने तसेच आ. संजय शिरसाट यांनी त्यांची लागलीच भेट घेतल्याने ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील, असे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. मात्र असे असले तरी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर आणि आ. अतुल सावे यांनी तनवाणी कोठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून तनवाणी हे भाजप सोडून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षाने शहराध्यक्षपदी त्यांच्याऐवजी संजय केणेकर यांची नियुक्ती केल्याने ते पक्षावर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचाही केणेकर यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. सोमवारी सकाळपासूनच तनवाणी पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ते पक्षात यावे यासाठी त्यांचे मित्र आ. संजय शिरसाट हेदेखील गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. तनवाणी यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पक्षाने त्यांना शहराध्यक्ष म्हणून दिलेली गाडी परत केली. ती त्यांनी भाजपच्या उस्मानपुरा कार्यालयासमोर उभी केली. तनवाणी यांनी वाहन परत केल्याचे कळताच आ. अतुल सावे हे तनवाणी यांच्या निवासस्थानी धावले. आ. सावे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आ. शिरसाट हे तनवाणी यांच्या घरी गेले. तेथे सुमारे अर्धा तास त्यांनी तनवाणी यांच्यासोबत चर्चा केली. तनवाणी यांनी भाजपचे वाहन परत केल्याची वार्ता लागलीच शहरात पसरली आणि ते स्वगृही परततील अशी चर्चा सुरू झाली. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेनेचे असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचे धोरण शिवसेनेने अवलंबिले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी महापौर गजानन बारवाल यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यापूर्वीपासून तनवाणी हे स्वगृही परतण्यास उत्सुक असल्याचे वातावरण शिवसेनेतर्फे निर्माण करण्यात आले आहे. तनवाणी यांच्यासोबत भाजपचे किमान तीन ते चार विद्यमान नगरसेवक आणि काही माजी नगरसेवक तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा  आहे. तनवाणी यांनीही आपला प्रवेश हा किरकोळ प्रवेश न ठरता तो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तनवाणी कुठेही जाणार नाहीतभाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे कुठेही जाणार नाहीत. ते पक्षासोबत राहणार आहेत, असा दावा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी केला. पक्षाने शहराध्यक्षांना संघटन बांधणीसाठी दिलेले वाहन कार्यकाळ संपल्यानंतर पक्ष कार्यालयाकडे जमा करावे लागते. त्यानुसार तनवाणी यांनी त्यांच्याकडील चारचाकी वाहन विभागीय कार्यालयाकडे जमा केले आहे. वाहन जमा केले, याचा अर्थ ते पक्षातून जाणार आहेत, असा होत नाही.- संजय केणेकर, शहराध्यक्ष, भाजप 

सदिच्छा भेट होतीमी तनवाणी यांना नेहमीच भेटतो. आजही त्यांची त्या पद्धतीनेच भेट घेतली. त्यांची मनधरणी करण्यासाठी मी गेलो नव्हतो. तर ही एक नेहमीसारखी भेट होती. - अतुल सावे, आमदार, भाजप 

ते निर्णय घेण्यास सक्षममी आज त्यांची भेट घेतली असली तरी त्यांच्या प्रवेशासंदर्भातील विषय चर्चेला नव्हता. ते नाराज आहेत किंवा काय हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. ते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम आहेत. - संजय शिरसाट, आमदार, शिवसेना 

पक्षाचे वाहन आज परत केलेभाजप शहराध्यक्षपदावर असताना माझ्याकडे एक चारचाकी वाहन होते. शहराध्यक्षपद नसल्यामुळे मी आज वाहन परत पक्षाच्या कार्यालयात जमा केले. वाहन परत करणे म्हणजे पक्ष सोडणे असा अर्थ होत नाही. ज्याला त्याला वाटेल त्या पद्धतीने अर्थ काढत असेल तर मी काय करणार आहे. मी अद्यापपर्यंत भाजपमध्येच आहे.    -किशनचंद तनवाणी, माजी शहराध्यक्ष, भाजप

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीAurangabadऔरंगाबादBJPभाजपाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका