शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:54 AM

Corona Virus : राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास वसुली

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या ( Corona Virus In Maharashtra ) नव्या म्युटंट (उत्परिवर्तित प्रकाराचे) आणि तिसऱ्या लाटेचे संकट उभे आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच प्रवासाची मुभा दिली जात आहे (allowed to cross the state border without RTPCR, vaccination by giving money) . हीच संधी साधून राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास दोनशे, पाचशे रुपयांची वसुली करून ये-जा करण्याची मुभा दिली जात आहे. हा प्रकार कोरोना वाढीला हातभार लावणारा ठरण्याची भीती नाकारता येत नाही.

कोरोनाच्या नवीन म्युटंट ‘ओमिक्राॅन’च्या धास्तीने राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोनासंदर्भातील नवीन नियमावली शनिवारी जारी करीत निर्बंध कडक केले. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस, कॅब अशा सर्व सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेल्यांपैकी दोन प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे शनिवारी समोर आले. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर प्रवाशांकडे आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल विचारला जातो. त्याबरोबरच लसीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्रही विचारले जाते. ज्यांच्याकडे यापैकी काहीही नाही, त्यांना एक तर परत पाठविणे अथवा जागेवर अँटिजन तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, असे काहीही होत नाही. प्रतिप्रवासी दोनशे ते पाचशे रुपये उकळले जातात. सोलापूर- भैरूनगी - इंडी (कर्नाटक), अक्कलकोट-गाणगापूर (कर्नाटक) रस्त्यावर हा अनुभव अनेक प्रवाशांना येत आहे. लसीकरण, आरटीपीसीआर प्रमाणपत्राची विचारणा करणारे अगदी साध्या गणवेशात, पायात चप्पल घातलेले लोक पाहायला मिळतात. एखादा कर्मचारी खाकीतील असतो.

काय आहे धोका ?लस न घेतलेले नागरिक, आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र नसलेले नागरिक अगदी सहजपणे ये-जा करीत आहेत. म्हणजे राज्यासह इतर राज्यांतही नागरिक लसीचा एकही डोस न घेता जात असल्याचा प्रकार होत आहे. राज्यात कडक निर्बंध लावले जात आहेत; परंतु पैशांच्या जोरावर सीमा भागांत होणारा बिनधास्त वावर कोरोनावाढीच्या दृष्टीने महाग ठरण्याची भीती नाकारता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकAurangabadऔरंगाबाद