शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या; कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याने ८० लाखांची एफडीआरची रक्कम हडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:37 IST

शासकीय कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, बँक कर्मचाऱ्यांना पैसे देऊन मारला हात

छत्रपती संभाजीनगर : जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, कागदपत्रे सादर करून शासकीय कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याने एफडीआरचे ८० लाख ३६ हजार रक्कम हडपले. फिरोज खान मुनाफ खान (रा. भारतनगर, गारखेडा) याने हा घोटाळा केला. विशेष म्हणजे, बँक ऑफ बडोद्याच्या तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या घोटाळ्यात हात धुवून घेतल्याच्या आरोपावरून फिरोजसह त्यांनाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

सचिन देशमुख हे शासकीय कंत्राटदार असून २०१० पासून अमर इन्फ्रास्ट्रक्चर फर्मद्वारे जलसंधारण विभागाची कामे करतात. २०२२ पासून फिरोज त्यांच्याकडे नाेकरीला होता. २०२४ मध्ये जलसंपदा विभागाकडून त्यांना कवडगाव रस्ता व पुलाचे काम मिळाले होते. नियमाप्रमाणे त्यांनी विभागाच्या नावे बँक ऑफ बडोद्याच्या खात्यात ३२ लाख ४४ हजारांची एफडीआर (ठेव) केली होती. त्यासाठी संबंधित विभागाचे प्रमाणपत्र दिले. काम पूर्ण झाल्यावर २० मे रोजी विभागाच्या अभियंत्यांनी एफडीआर सोडण्यासाठी ऑर्डर व मूळ प्रमाणपत्र दिले.

बँकेकडून मात्र देशमुख यांना एफडीआर रक्कम आधीच काढली असल्याचे सांगितले. देशमुख यांनी सर्व कागदपत्रे तपासली असता ते सर्व बनावट असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय, त्यांच्यासह त्यांचा भागीदार शेख रफिक, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट सह्या, लेटरहेड देऊन फिरोजने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. एप्रिल, २०२४ ते मे, २०२५ दरम्यान त्याने अशा तब्बल १३ एफडीआर सोडवून ८० लाख ३६ हजार रुपये लंपास केले. तसेच फिरोजने ८० लाखांसोबत देशमुख यांच्या चेकवर खोट्या सह्या करून ४० हजार रुपये नातेवाइकाच्या बँक खात्यावर वळवले. याप्रकरणी तक्रार येताच आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी गुन्हा दाखल करून फिरोजला अटक केली. न्यायालयाने त्याला ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले.

काय असते एफडीआर ?शासकीय कंत्राट घेण्यासाठी शासकीय खात्यात कंत्राटाच्या किमतीच्या प्रमाणानुसार संबंधित शासकीय विभागाच्या नावाने थर्ड पार्टी ठेव म्हणजेच एफडीआर ठेवावी लागते. काम पूर्ण झाल्यावर संबंधित विभागाचे अधिकारी ही ठेव सोडवण्यासाठी ऑर्डर काढतात. त्यानंतर बँक एफडीआर सोडवून कंत्राटदाराच्या खात्यावर रक्कम जमा करते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी