वनतस्करांना रान मोकळे
By Admin | Updated: August 31, 2014 00:12 IST2014-08-30T23:48:23+5:302014-08-31T00:12:15+5:30
किनवट : वनरक्षक-वनपाल संघटनेने आयोजित संपात किनवट, माहूर तालुक्यातील ३०० च्या आसपास वनपाल, वनरक्षक सहभागी झाल्याने लाकूड तस्करांसाठी रान मोकळे झाले.

वनतस्करांना रान मोकळे
किनवट : वनरक्षक-वनपाल संघटनेने आयोजित संपात किनवट, माहूर तालुक्यातील ३०० च्या आसपास वनपाल, वनरक्षक सहभागी झाल्याने लाकूड तस्करांसाठी रान मोकळे झाले. दरम्यान, २९ आॅगस्ट रोजी रात्री पानधरा जंगलातील जवळपास १२ सागवान झाडांची कत्तल करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीे.
वनरक्षक पदाचे अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करणे, निश्चित प्रवास भत्ता मिळणे, राज्यसीमा तपासणी नाक्यावर वनपालांची नियुक्ती करणे, वनरक्षक, वनपाल यांना ८ तासांचे काम द्यावे. या व इतर काही मागण्यांसाठी महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना नागपूरने २५ आॅगस्ट -पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात किनवट तालुक्यातील वनपाल, वनरक्षक सहभागी झाल्याने लाकूड तोड व तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या किनवट तालुक्यातील लाकूड चोरट्यांना एकप्रकारे रानच मोकळे झाले आहे. दरम्यान, २९ आॅगस्टच्या रात्री किनवट वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पानधरा जंगलात जवळपास १२ सागवानाची झाडे तोडून माल लांबविल्याची घटन घडली आहे. मात्र अशा आणखी किती अवैध सागवान कटईच्या घटना गेल्या सहा दिवसांत घडल्या असाव्यात हे जंगलात पाहणी केल्यास उघड होईल.
वनरक्षक-वनपाल संपावर असतानाच आता वनपरिक्षेत्राधिकारी जंगलात गस्त घालत आहेत. पानधरा जंगलात जवळपास १२ सागवान झाडे तोडून काही माल लांबविला तर काही माल पडून असल्याचे वनक्षेत्रपाल आडे यांनी सांगितले. (वार्ताहर)