वन विभागाने वाचविले जखमी वानराचे प्राण
By Admin | Updated: May 30, 2016 01:15 IST2016-05-30T00:57:50+5:302016-05-30T01:15:32+5:30
औरंगाबाद : एन-२ ठाकरेनगरात वानराच्या दोन गटांत हाणामारी सुरू झाली अन् लगतच्या इमारतीवरून वानर थेट डीपीवर पडले. बचावासाठी त्याने केलेल्या

वन विभागाने वाचविले जखमी वानराचे प्राण
औरंगाबाद : एन-२ ठाकरेनगरात वानराच्या दोन गटांत हाणामारी सुरू झाली अन् लगतच्या इमारतीवरून वानर थेट डीपीवर पडले. बचावासाठी त्याने केलेल्या प्रयत्नात जिवंत तारेचा स्पर्श होऊन ते गंभीर जखमी झाले. भाजलेल्या अवस्थेत वानराला चालणेही कठीण झाले होते. वन विभागाच्या पथकाने जीव धोक्यात घालून जखमी वानराला सुरक्षित बाहेर काढले.
दामूअण्णा शिंदे, संदीप लगड, संकेत काळे, अमोल टेहरे या स्थानिक नागरिकांनी सकाळी अपघाताचा प्रकार पाहिला व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापूरकर यांना माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वनपाल एस. आर. भांबळे, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी, ए. एच. सिद्दीकी, साईनाथ नरवडे, राजू हिवाळे घटनास्थळी दाखल झाले; परंतु डीपीच्या आवारात कुणालाही घुसणे शक्य नव्हते. आत जाणाऱ्यावर वानर धावून येत असल्याने कुणीही हिंमत करीत नव्हते.
जखमी वानराला उपचाराची आवश्यकता होती; परंतु त्याला पकडणे शक्य नव्हते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार डॉ. नंदन, शेळके हे भूल देण्याचे इंजेक्शन व साहित्य घेऊन आले. त्यांनी एअरगनने मारलेले पहिले इंजेक्शन वानराने हाताने काढून फेकून दिले.
पुन्हा दुसऱ्यांदा मारलेल्या इंजेक्शनने अचूक नेम साधला. त्यामुळे वानर हळूहळू बेशुद्ध झाले.
४सकाळपासून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रयत्नानंतर सायंकाळी वानराला ताब्यात घेऊन उपचारासाठी नेण्यात आले.