शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

वन विभाग व इको बटालियनने १,०८० हेक्टरवरील ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:14 IST

जागतिक पर्यावरण दिन:या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर: "झाडे लावा, झाडे जगवा", "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" अशा घोषवाक्यांमधून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मात्र, अनेकदा केवळ औपचारिकतेपुरतेच हे उपक्रम मर्यादित राहतात. याला अपवाद ठरली आहे ‘इको बटालियन’. निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक जबाबदार संघटना, जिने गेल्या सात वर्षांत झाडे लावण्याचे केवळ नारे न देता, प्रत्यक्ष कृतीद्वारे डोंगर-दऱ्यांत, माळरानावर हिरवळ फुलवली आहे.

इको बटालियनने वन विभागाच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगरमधील ओसाड माळरानावर तब्बल १,०८० हेक्टर क्षेत्रावर १७ लाख २ हजार ८५५ वृक्षांची लागवड केली असून, त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. शेंद्र बन, सिरसमाळ, कोलठाण, कुबेर गेवराई अशा अनेक भागांमध्ये ही हिरवळ फुलवली आहे. या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे. अतिक्रमण आणि झाडतोडीला आळा बसला असून, आज त्या भागात हरण, काळवीट, नीलगाय, मोर, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त वावर वाढत आहे. त्यामुळे या भागातील पर्यावरणीय समतोल पुन्हा प्रस्थापित होत आहे.

यंदा जटवाडा, रहाळपट्टी तांड्यात लावणार १ लाख वृक्षयावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको बटालियनने एक लाख नव्या वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा व रहाळपट्टी तांडा येथील ९० हेक्टर परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात इको बटालियनचे अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासन सहभागी होणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली.

प्लॅस्टिक प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्नवनसंवर्धनासाठी समर्पित प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले असून, इतरांसाठी हे एक प्रेरणादायक उदाहरण ठरू शकते. यासह अनेक प्रस्तावित प्रकल्प या कंपनीला वनविभागाने सोपवले आहे. त्याचा फायदा वृक्षारोपण आणि संगोपनासाठी उपयुक्त ठरणार आहे. एक झाड एका व्यक्तीने लावलेच पाहिजे, असा नारा दिला आहे. पर्यावरणाची थीम प्लॅस्टिक निर्मूलन आहे. प्लॅस्टिकने जमीन नापीक होत आहे. शासनानेही विरोधी अभियान राबविलेले आहे. परंतु, आज प्रत्येक जण प्लॅस्टिक वापर करताना दिसत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरforest departmentवनविभाग