लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:27 IST2017-09-13T00:27:55+5:302017-09-13T00:27:55+5:30
येथील युवक काँग्रेसच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील युवक काँग्रेसच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
भाजपाच्या वतीने सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात शेतकरी कर्जमाफी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात लोणीकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. या टीकेचा युवक काँग्रेस परभणी लोकसभेच्या वतीने निषेध करुन लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागसेन भेरजे, अकबर जहागीरदार, आतेफ इनामदार, अभय देशमुख, दिगंबर खरवडे, सचिन जवंजाळ, श्रीकांत पाटील, वसीम कबाडी, सुरेश देसाई, किशन काळे, रईस खान, अंगद सोगे, मयूर मोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.